शुक्रवार, २७ जून, २००८

आला आषाढ-श्रावण - बा.सी.मर्ढेकर

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

९ टिप्पण्या:

Amol म्हणाले...

Hi kavita aamhala shalet hoti. far chan kavita aahe. me parat ekda shalet shikavalelya chalit mhanun pahili. Majja aali... Thanks for it.

Unknown म्हणाले...

खूपच सुंदर बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या .

Unknown म्हणाले...

१नंबर

Unknown म्हणाले...

👌श्रावण महिण्याचे सुंदर वर्णन

Unknown म्हणाले...

सुन्दर

Unknown म्हणाले...

Apratem Bal sitaram mardhekar navkaviteche janak

Unknown म्हणाले...

malahi shalet hoti hi Kavita fa aawdte mala kadhihi tichi aathvan aali ki man bhijun ole chimb hote ya Kavitene !!Dhanywad !!!

Unknown म्हणाले...

Chhan ahe kavita shalet hoti

Unknown म्हणाले...

आम्हाला होती हि कविता, वर्गात आम्ही सर्वजण चढाओढीने गात होतो . खूप छान आहे.आज त्या आठवणी जाग्या झाल्या, बालपणीच्या. " धन्यवाद "