बुधवार, २८ जानेवारी, २००९

ती फुलराणी - बालकवी

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !

७ टिप्पण्या:

Prashant म्हणाले...

Scripting correction....

It should be
वाऱ्यावरती
instead of
वार्यावरती

or... is it only my browser? (Firefox 3. I can see all other unicode and this blog fine)

Thanks, absolutely love this blog.

Hrishikesh (हृषीकेश) म्हणाले...

Corrected.

धन्यवाद!

Yashodhan म्हणाले...

rangrangulya sansanulya gatphula re gavatphula kavita pahije hoti kunachi ahe mahit nahi

vaidehi mulik म्हणाले...

@yashodhan - mazyakade hi kavita ahe..

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा

मित्र।संगे माळावती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहिले गवतावरती डुलता डुलता हसताना

विसरुनी गेलो पतंग नभीचा विसरुनी गेलो मित्र।ला
पाहुनि तुजला हरखुनी गेलो अशा तुझ्या रे रंगछटा

पिवळी नाजुक रेशीम पाती दोन बाजुला सळसळती
निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती

कळी पुन्हा अन् गोजिरवाणी लाल पाकुळी खुलते रे
उन्हा मधे हे रंग पाहता भान हरखुनी गेलो रे

पहाटवेळी अभाळ होते लहान होउनी तुझ्याहुनी
तुझ्यासंगती रमून जाती विसरुनी शाळा घर कोणी

M not sure about the last line..
Mazi aai nehmi hi kavita gaat ase.. Mazyahi aavdichi ahe.. Its bit odd ki etki chan kavita asunhi net var uplabdha nahiye..

vaidehi mulik म्हणाले...

@ yashodhan -

Shevatchya oli baddal me doubtful ahe.. Tumhala mahit asel tar plz malahi sanga..

Mazi aai hi kavita nehmi mala aikvaychi lahanpani, ajunhi aikavte.. Mazyahi aavdichi ahe.. Pan aashcharya vatate ki net var matra hi uplabdha nahiye..

vaidehi mulik म्हणाले...

@yashodhan - mazyakade hi kavita ahe..

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा

मित्र।संगे माळावती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहिले गवतावरती डुलता डुलता हसताना

विसरुनी गेलो पतंग नभीचा विसरुनी गेलो मित्र।ला
पाहुनि तुजला हरखुनी गेलो अशा तुझ्या रे रंगछटा

पिवळी नाजुक रेशीम पाती दोन बाजुला सळसळती
निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती

कळी पुन्हा अन् गोजिरवाणी लाल पाकुळी खुलते रे
उन्हा मधे हे रंग पाहता भान हरखुनी गेलो रे

पहाटवेळी अभाळ होते लहान होउनी तुझ्याहुनी
तुझ्यासंगती रमून जाती विसरुनी शाळा घर कोणी

M not sure about the last line..
Mazi aai nehmi hi kavita gaat ase.. Mazyahi aavdichi ahe.. Its bit odd ki etki chan kavita asunhi net var uplabdha nahiye..

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

http://ek-kavita.blogspot.com/2008/09/blog-post_24.html Indira Sant