बुधवार, २८ जानेवारी, २००९

केकावली - मोरोपंत

(वास्तविक केकावलीमध्ये १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक येथे देत आहे)

(मातृमहिमा)
पिता जरि विटे, विटो; जननी कुपुत्री विटे;
दयामृतसार्द्रधी कुलकज्जले त्या किटे;
प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले ऋण जन्मदेचे फिटे

(वरप्रसादयाचना)

सुसंगति
सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो

न िनश्चय कधी ढळो; कुजनिवघ्नबाधा टळो;
न िचत्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरिभमान सारा गळो;
पुन्हा न मन हे मेळो दुिरत आत्मबोधे जळो ॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।
कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,
तशि प्रकट हे िनजाश्रितजनां सदा सावरी ॥

दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?
तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे

४५ टिप्पण्या:

Leena म्हणाले...

My Ajoba used to recite some 'Arya'.
Not sure of which poet are those.
If you know, kindly let me know.

Here is one I remember.

is this from kekavali?

बालपणी मुलांना खेळणेच आवडते
परि ते वय गेल्यावर विद्या येण्यास फार जड जाते
बालपणी मुलांची तरुतुल्य बुद्धी वाकेल
घेईल ज्या गुणा ते तो गुण मति वेष्ठुन फाकेल

Unknown म्हणाले...

I am R.S. Dandekar from Miraj. I am a "Kirtankar" and also studying "Shrimad Bhagwat" For that purpose I want "Mantra Bhagwat" written by 'Moropant' Mantra Bhagwat means 'Om Namo Bhagwate Vasudevaya' Moropant wrote Arya using first word of above mantra. I request your Honour to send me any information on the above subject if you have on my e-mail id rs.dandekar76@gmail.com

Thaning you,

Yours
Dandekar

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

श्रीमती लीना, शेऱ्याबद्दल आभारी आहे. आर्या ही मोरोपंतांचीच.

श्री. रोहित दांडेकर,

सप्रेम नमस्कार आणि आमच्या कवितांविषयीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार! त्याहीपेक्षा किर्तनासारख्या लोप पावत चाललेल्या कलेची उपासना करीत असल्या बद्दल आभार.

दुर्देवाने माझ्याकडे मंत्रभागवत ह्या बद्दल कसलीच माहिती उपलब्ध नाही. पण खालील संकेतस्थळाला आपण जरुर भेट द्या. आपल्याला बरेच उपयोगी संदर्भ मिळतील!

मन:पूर्वक शुभेच्छा!

dn.usenet म्हणाले...

कविता छंदात असल्यास त्याचा उल्लेख करावा.
उदा. बोरकरांची 'देखणे ते चेहरे ज़े प्रांजळाचे आरसे' ही कविता र-त-म-य-र असे गण पडणार्‍या 'सीता' वृत्तातली आहे. याच्यापुढे र-त-ग लावून माधवराव पटवर्धनांनी
'कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला
थांबला तो संपला'
आणि कुसुमाग्रजांनी
'जेथ युद्‌धाची धुमाळी ...
ज़ा ज़रा पूर्वेकडे'
या रचना केल्यात. या वृत्ताला वेगळं नाव असल्यास कल्पना नाही.

मोरोपंतांची खालील रचना तदनुषंगिक माहितीसकट या ठिकाणी वापरावीशी वाटल्यास मी देतो आहे.

ओवी हा प्रकार मोरोपंतांना आर्येच्या फार ज़वळचा वाटे, आणि त्यांनी एक
हरिहरांप्रमाणे एकरूप झालेल्या ओवी-आर्या-प्रकारात, चमत्कृतिकडे
झुकणार्‍या, १४ रचना करून त्यांना ओवीमय आर्या असे नाव दिले होते.

ओवीमय आर्यांविषयी मोरोपंत म्हणतात: 'आर्या ओवींत दिसे; ओवी आर्येंत
पाहतां नीट' . निव्वळ शब्दांचे वज़न बदलून हे दोन्ही काव्यप्रकार आपल्यात
सामावणारी ही सिंपली अ-मे-झिं-ग रचना नमुना म्हणून पहा :
ओवी : सीताकांता, मेघश्यामा - हा दीन दास लक्षावा, रामा |
अनुदिन वदनीं नामा - वसवूनि नित्य रक्षावा ||
आर्या : सीताकांता, मेघ~श्यामा, हा दीन दास लक्षावा |
रामा, अनुदिन वदनीं ~ नामा वसवूनि नित्य रक्षावा ||

rajendra vaishnav म्हणाले...

HE VAMANA DHARONI SANT PADAS VAHE.....
ashi ek rachna mazya vadilani sangitli hoti. ti kunachi aahe ani pudhil oli atta athwat nahit.. ya char olithi shabdhanchi khoop durmil kimaya kavine keleli aahe... asel tar aksharyogi@gmal.com var pl. takta yeil kay?

Rajendra Vaishnav

Unknown म्हणाले...

mala nehami moropantachya kekacalichi athavan yete officemadhe kam karit asatana suddha me mhanat asato mala mazya sahakaryane vicharle he kay mhanat asata tumhi me mhanalo are he tar moropantachi kekavali tyala ti ata havi ahe tyache shabda ase ahet DAYABDHA VALASHIL TU TARI NA CHATAKA SEVAKA UNE KIMAPI BHAVIKA ....... (KAHI CHUKALE ASALYAS MAPH KARAVAE) ani kunala athavat asatil tar me apal abhari asel maza email vijaykelkar13@gmail.com abhari ahe.

BookWorm म्हणाले...

Rathchakra udharu de hi ovi ahe kankonakade

Siddhiyug म्हणाले...

माझेही आजोबा म्हणायचे

Unknown म्हणाले...

फळे मधुर खावया असती नित्य, ही कविता पूर्ण व कविचे नाव आपण देवू शकलात आभारी असेन.

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

This Link has all the "anyokti"...

Unknown म्हणाले...

Keshavam patitam Toyan, pandava harsh nirbhara, rudanti pannaga sarve, ha ha keshav keshav.

Unknown म्हणाले...

Maze guruji ajun pn mhntat

Unknown म्हणाले...

फळें मधुर खावया असती नित्य मेवे असे
हिरेजडित सुंदरी कनक पंजरी ही वसे
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे
स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे

गायत्री मुळे म्हणाले...

वाह ...

Unknown म्हणाले...

मोरोपंत आर्यांचे पुस्तक कोठे उपलब्ध आहे.

Unknown म्हणाले...

कृष्णशास्त्री चिपळूणकर

Unknown म्हणाले...

माफ करा🙏

फळें मधुर खावया असती नित्य मेवे *तसे*




स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी *सुखातें* स्मरे

R.K.MAHAJAN म्हणाले...

ल रा पांंगारकर व मोरोपंंतांंचा काय संंबंंध आहे? कृृपया विषद करा.

Unknown म्हणाले...

Ho Mala pn hvi aahet aaplyas bhetlyavr Krupaya mala pn sangne 8605991552nomeber

TEJASHREE म्हणाले...

कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली....
ही मोरोपंतांचीच रचना आहे ना?
संपुर्ण मिळाल्यास आभारी असेन...

TEJASHREE म्हणाले...

कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली....
ही मोरोपंतांचीच रचना आहे ना?
संपुर्ण मिळाल्यास आभारी असेन...

Unknown म्हणाले...

Hya kaviteche shirshak "Anyokti" ase hote

Unknown म्हणाले...

कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली.- https://www.youtube.com/watch?v=aFCEtlpoDMc

TEJASHREE म्हणाले...

मोरोपंतांनी तुकाराम महाराजांवर तीस आर्या लिहिलेल्या आहेत.
त्या मिळतील का?

Unknown म्हणाले...

Moropantanche Sita geet mahiti asel tarte post karave.

Unknown म्हणाले...

नमस्कार, आपण या कमेंट मध्ये लिंक बद्ददल बोलला आहात। पण ती दिलेली नाही! कृपया मला खालील मेल आय डी वर पाठव्हावी!

Prabhanjan.piyush@gmail.com

Unknown म्हणाले...

माझे वडिलांना केकावली कंठस्थ होती.त्या तील ओव्या नेहमीम्हणत असे.
सुनील दत्तात्रय कोकीळ.

Unknown म्हणाले...

कोण कुणाचा नाही जगती,संकट समई सोडुन जाती

Unknown म्हणाले...

भकायास फळे चहूकडुनीया एकत्र जे जाहले
येता संकट काळ होय जवळी कोणी न ऐसा मिळे.
याच्या आधीच्या ओळी कोणाला माहिती असल्यास सांगाव्या.

Unknown म्हणाले...

कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली, पुरःसरगवासवे झगडतां तनू भागली, सहाय दुसरा नसे तुजविणें बळें आगळा, न हो जरि उताविळां स्वरिपु कापितो हा गळा.

marathi kavita म्हणाले...

पुर्ण 122 श्लोक मिळतील का

marathi kavita म्हणाले...

पुर्ण 122 श्लोक मिळतील का

Unknown म्हणाले...

विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी हि कविता आहे का?

Unknown म्हणाले...

बालपणाचा मित्र परंतु प्रसंग येतात म्हणे कोण तू

Anjali Joshi म्हणाले...

केकावलीतील ल ग क्रम मात्रा यति इत्यादि
संपूर्ण माहिती मिळावी

Unknown म्हणाले...

फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे हिरेजडित सुंदर कनक पंजरीही वसे. अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वन वृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे

Unknown म्हणाले...

माता असता मारी लाता..... पैसा असता सर्वही पुसती

Unknown म्हणाले...

माता असता मारी लाता.... पैसा असता सर्व ही पुसती.

Rashi Kulkarni म्हणाले...

क्रुतांत कटका ध्वज जरा दिसो लागली
पुरःसर गदासवे धगडिता तनू भागली।
सहाय्य दुररासे तूजविणे बळे आगळा।
न हो जरी उताविळा स्वरिपु कापितो हा गळा।।

Unknown म्हणाले...

नमस्कार
आमचे लहान बहिणीचे पती जे अमरावती विद्यापीठात अधीक्षक पदावर होते त्यांचे सोबत वैष्णोदेवी येथे जाण्याचा योग आला तेव्हा त्यांना कंठस्थ असलेली श्री मोरोपंतांनी रचलेली केकावली रचना ऐकण्यात आली तेव्हा ते फारसं समजलं नाही पण नंतर बराच शोध घेतला असता आता मिळाली रचना खूप खूप आभार.

Unknown म्हणाले...

कोण कुणाचा नाही जगती
संकटसमयी सोडून जाती
बालपणाचा मित्र परंतु
संकटसमयी म्हणे कोण तू
प्रेमिकेचा असे चाहता
माता होता मारे लाथा
पैसा असता मित्र भोवती
गरीब होता कुनीन पुसती

Mahibu म्हणाले...

कवि मोरोपंत

Mahibu म्हणाले...

संकटसमयी नाही वेळ प्रसंगी

Subhash म्हणाले...

कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली
पुरःसर गदासवे झगडिता तनु भागली
सहाय्य दुसरा नसे तुजविणेबळे आगळा
न हो जरि उताविळा स्वरिपु कापितो हा गळा

सुभाष फाटक
६ जानेवारी २०२३

Jagdish d patil actor म्हणाले...

सुसंगती सदा घडो" हा श्लोक कोणत्या वृत्तताला आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे