पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,
हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,
एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,
महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,
गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..
होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा
अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
गुरुवार, २९ जानेवारी, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३ टिप्पण्या:
हे गीत सु्र्व्यांचे नसून ग.दि.माडगूळकरांचे आहे. १९६१ साली आलेल्या ’प्रपंच’ चित्रपटात सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध करून गायलेले आहे.
हि कविता ग.दि.माडगूळकरांची आहे. प्रपंच चित्रपटातील हे गीत आहे.
शुभांगी राव
श्री. मिलिंद / शुभांगी,
आपण सुचवलेल्या दुरुस्तीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! अंमळ उशीराने का होईना दुरुस्ती केली आहे. देर से आए पर दुरुस्त आए/
टिप्पणी पोस्ट करा