बुधवार, २८ जानेवारी, २००९

मावळत्या दिनकरा - भा.रा.तांबे

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा !

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा !

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा !

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

good m

Chhaya Khadilkar म्हणाले...

जीवनाचे सार अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे. हॅट्स ऑफ टू भारा तांबे.

Unknown म्हणाले...

Kay bolnar tyanchya kavite babat... Tevdha motha mi nahi... Atishay khar ahe sagale.. ekun ek line.

Vasant Rambharati Gosavi , Sinnar. म्हणाले...

आजही तंतोतंत लाग पडणारे त्रिकालाबाधित सत्य.