क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!
अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं
निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.
असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
गुरुवार, १४ डिसेंबर, २००६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
३९ टिप्पण्या:
I have been looking for this for ages.
Thanks a lot. :)
But there are some mistakes in writing the poem.
Written : Kari Jatan
Should be : Karo Jatan
Written : Basale to shire baan
Should be : Basale na to shirat baan
Written : Dayaghana Khara
Should be : Dayaghana Ishwara
My mother used to sing for me this when I was a kid...
It is her favorite !
Thank You !
ातिशय सुरेख कविता
Thanks 🙏
Thanks for sharing, sunder kavita!
अतिशय सुंदर रचना audio व्हिडिओ असती तर अजून छान झाले असते
अतिशय सुंदर रचना audio व्हिडिओ असती तर अजून छान झाले असते
Very nice
ही कविता गायलेला व्हिडीओ पण मिळावा
ही कविता गायलेला व्हिडीओ पण मिळावा
स्मरा मज बरोबरी परि दयाघना खरा
------------------------
..या ओळीतील शेवटचा शब्द 'खरा'ऐवजी ...ईश्वरा आहे.
आता (साठवर्षावरील) मराठी माध्यमातून शिकलेल्यानी अशाप्रकारच्या सुंदर कविता आपल्या शालेय जीवनात अभ्यासल्या आहेत.बघा आठवून.
माझा बाबा ना ही पूर्ण पाठ आहे आणि मस्त चालीत ते म्हणतात.
ऐकताना डोळयांत आसवं दाटतात.खूपच सुंदर कविता
अतिशय सुंदर व अर्थपूर्ण कविता.
माझे वडील खूप छान म्हणून दाखवायचे आम्हला लहान असताना
वर सुचवलेली चूक दुरुस्ती योग्य आहे.
मराठी व्याकरण शिकवताना समासाचे उदाहरण म्हणून शेवटच्या चार ओळी आम्हाला शाळेत शिकवलेल्या आज आठवणीत आल्या.
मी ही कविता खूप आवडीने गात असे अर्थ खूप चांगला आहे मला ते दिवस आठवले खूप आनंद झाला
फारच अर्थपूर्ण कविता आहे. नवकविंनी अशा कविता कराव्या ही अपेक्षा.
फारच अर्थपूर्ण कविता आहे. नवकविंनी अशा कविता कराव्यात ही अपेक्षा.
माझ्या आईचे वय आज 65 वर्ष आहे ,मी एक शिक्षक आहे अन मुलांचा भावनिक विकास कसा साधायचा हे मला या कवितेने शिकवले ....हे सर्व माझ्या आईमुळे तिनेच लहान पणापासून मला अनेक वेळा ही कविता ऐकवली ,मी कितीतरी वेळा रडलो असेल ...अन तिथेच भावनिकतेचा ओलावा माझ्या हृदयात तयार झाला...अन तोच ओलावा मला माझ्या विद्यार्थी याना घडवण्यात कामी येतोय ....अतिशय सुंदर व हृदयस्पर्शी कविता
ही कविता मी माझ्या शाळेत 8 वी ईयात्ता असल्यापासून संत मॅडम यांच्या वर्गात ऐकायची ... अविस्मरणीय कविता... या कवितेतून आईची महती उत्कृष्ट रित्या आणि समर्पक तेने मांडली आहे... आजही ह्या कवितेची आठवण झाली की डोळ्यात अश्रू दाटून येतात... थँक्यु कविवर्य नारायण वामन टिळक सर ज्यांनी आम्हा तरुण पिढीला कवितेतून क्रौर्य या शब्दाचं गर्भितार्थ माणसाच्या जीवनाशी किती व कसा निगडित आहे हे सांगितले 🙏 क्रूर तेला थारा देऊ नका हेच ही कविता शिकवते 🙏
My grandfather(Anna) used to say this poetry with actions.I love this poem an the whole story which defines the ultimate love.
इयत्ता सहावीत असताना ही कविता आम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात होती. अतिशय सुंदर चालीत आमच्या बाई कविता म्हणायच्या, कविता शिकवताना अक्षरशः घळाघळा अश्रू त्यांच्या डोळ्यातन वहायचे. माझी आई तिला आवडायची म्हणून ही कविता रोज म्हणायला लावायची. खूप,खूप बालपणीच्या शाळेतल्या आठवणी या कवितेशी जुळलेल्या आहेत .
ही कविता ‘पृथ्वी’ या वृत्तात ली आहे काय ?
Aaj mazya aajobanchi death zali ani te mala hi kavita gaun dakhvayche 😥 i will share his video with you pn kuthe share kru ? I mn mi maza personal no nhi share kru shakt ithe site vr
Mine too , only difference is i lost my granpa today n hence reached uptothis poem
Kavitecha nav BAPDI ahe
हो,बरोबर. या कवितेचे वृत्त आपण सांगितले, ते बरोबर आहे.
माझे वय आता ६५ वर्षे आहे गेले काही दिवस आमच्या घराच्या बाल्कनीच्या बाहेरील झाडावर एक पक्षी येतो आणि सकाळ दुपारी आणि संध्याकाळी अतिशय सुंदर गात असतो त्याचे गाणे एकूण मला बालपणी शाळेत शिकलेल्या वरील कवितेची आठवण झाली आणि डोळे भरून वाहू लागले . धन्य तो कवी
माझे वय आता ६५ वर्षे आहे गेले काही दिवस आमच्या घराच्या बाल्कनीच्या बाहेरील झाडावर एक पक्षी येतो आणि सकाळ दुपारी आणि संध्याकाळी अतिशय सुंदर गात असतो त्याचे गाणे एकूण मला बालपणी शाळेत शिकलेल्या वरील कवितेची आठवण झाली आणि डोळे भरून वाहू लागले . धन्य तो कवी
माझे वय आता ६५ वर्षे आहे गेले काही दिवस आमच्या घराच्या बाल्कनीच्या बाहेरील झाडावर एक पक्षी येतो आणि सकाळ दुपारी आणि संध्याकाळी अतिशय सुंदर गात असतो त्याचे गाणे एकूण मला बालपणी शाळेत शिकलेल्या वरील कवितेची आठवण झाली आणि डोळे भरून वाहू लागले . धन्य तो कवी
And so did I...
My father also sing when I was kid.and I sing for my granddaughter. Beautiful poem and words.
ह्या कवितेबद्दल सांगायचे तर माझे मोठे भाऊ आता 68वर्षाचे आहेत .त्यांना त्यावेळी (साधारण 1964/1965 साल ) सोनार गुरुजी म्हणून मराठी शिकवायला होते. अतिशय कडक शिस्तीचे म्हणून ते प्रसिद्ध होते. पण ही कविता शिकवताना तेही अक्षरशः घळाघळा रडले होते ,संपूर्ण वर्ग स्तब्ध होता. आणि ही आठवण माझे भाऊ आम्हाला अजूनही सांगतात जेव्हा नेहमी एकदम भावनिक होतात आणि माझ्या डोळ्यात पाणी तरळते.आजकाल एव्हढ्या अर्थपूर्ण कविता किंवा लिखाण वाचायला खूपच कमी मिळते .
संपूर्ण कविता शार्दूलविक्रिडीत वृत्तात असून शेवटले कडवे फक्त पृथ्वी वृत्तात आहे.
आजच सकाळी श्री. मारुती चितमपल्ली यांचे चकवाचांडण हे पुस्तक वाचताना ह्या कवितेचा उल्लेख आढळला म्हणून गुगल वर शोधली आणि ती मिळाली. शाळेतल्या आठवणी आल्या. आम्हीपण शाळेत सर्वजण मोठ्यांदा ही कविता म्हणत असू. त्या आठवणीने सकाळ खूप सुंदर झाली.
I must be of around 10-12-year-old school-going kid when I read this poem in my textbook of Marathi.
My school teacher, Mrs. Kulkarni first sang the poem in such a voice that many of us had tears in our eyes, without even knowing the meaning of many of the words.
I think the poet was known as "Reverend Tilak" in those days. (Pardon me I m wrong.)
This poem touches everyone's hearts. I feel that it is more about motherly love and compassion
or "Vatsalya".
I am 72 years of age now but this poem brings tears to my eyes even today.
kharay
टिप्पणी पोस्ट करा