शुक्रवार, २० जून, २००८

या बाळांनो, या रे या ! - भा. रा. तांबे

या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया

१७ टिप्पण्या:

. म्हणाले...

मित्रा, तुला माहित नाही, तू किती छान काम करतो आहेस‌! आम्हाला तुझा हा प्रयत्न खरोखर खूपच आवडला. तुला धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत. कृपया, आता थांबू नका! लिहिते रहा...

. म्हणाले...

मराठी किती स‌ुंदर आहे, याची मलमली जाणीव हे असं काही वाचलं, की स‌ारखी होत राहते..
पुन्हा एकदा धन्यवाद!
आपला,
विसोबा खेचर.

Unknown म्हणाले...

खुपच छान सर

Unknown म्हणाले...

आपली कविता माझा लहान भाऊ परीपाठात सादर करणार आहे

Unknown म्हणाले...

Very nice

Unknown म्हणाले...

या कवितेत अजून काही ओळी होत्या त्या कां नाही इथे दिल्या ?
वाहता निर्झर मंदगती डोलता पताका वृक्षतटी
पक्षी मनोहर कूजित रे कोणाला गातात बरे..

Deepak म्हणाले...

Chan

Unknown म्हणाले...

बालपण आठवलं रे मित्रा..
धन्यवाद

Unknown म्हणाले...

लाहान पणाची गोड आठवण

Unknown म्हणाले...

कवीनचे नाव का बरं दिले नाही ! त्याचा साठी आलो होतो

Unknown म्हणाले...

आज माझे वय ५६ वर्ष आहे, मला चवथीला असलेली ही कविता आजही मुकाम, तोंडपाठ आहे. धन्य ते आमचे डेरे गुरुजी...

Unknown म्हणाले...

एक कविता आठवते--
खुजबुज खुजबुज खुजबुज रे
चंदनाच्या झाडाखाली माती का गळे.

ही कविता कुणाची? पुढच्या ओळी काय?
Thank you.

Unknown म्हणाले...

एक कविता आठवते--
खुजबुज खुजबुज खुजबुज रे
चंदनाच्या झाडाखाली माती का गळे.

ही कविता कुणाची? पुढच्या ओळी काय?
Thank you.

Unknown म्हणाले...

कवी भा.रा.तांबे

Unknown म्हणाले...

मित्रा, Love you.... खरच रे तुझ्या प्रयत्ना मुळे आज शाळा आठवली.... 👍🙏💐🙏

Unknown म्हणाले...

तुमच्या ओळी वरिल 'या बाळांनो या रे या' मधील नाहीत तर,'इकडे तिकडे चोहीकडे, आनंदीआनंद गडे' या कवितेतील आहेत. मात्र वरिल कवितेत सर्व कडवी नाहीत हे खरेच.

नितीन दा म्हणाले...

आपण बुलढाण्याच्या शाळेत होतात काय ? डेरे गुरुजींवरून तसे वाटले .