शनिवार, १४ एप्रिल, २००७

पालखीचे भोई - शंकर वैद्य

पाकखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥

४ टिप्पण्या:

vilas khade म्हणाले...

mala abhiman ahe bhoi asanyacha.....jai maharashtra jai bhoi....vilas khade,badlapur

Dattatray Kulkarni म्हणाले...

एका चिरंतन वेदनेचा हुंकार!

Nikhil Khandekar म्हणाले...

लहानपणी खुद्द कविच्या तोंडी
ऐकली तेव्हा पासून ...

Nikhil Khandekar म्हणाले...

लहानपणीच खुद्द कविंच्या तोंडी ऐकली तेव्हापासून आम्ही फिदा!