स्वातंत्र्यदेवीची विनवणी
पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
शुक्रवार, २० एप्रिल, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
१० टिप्पण्या:
jivanavaril sarvottam kavita
एक कविता एक विचार,संवेदनाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची क्षमता या कवितेत आहे
सलाम 🇮🇳
Asa kavi hone nahi
Nice poem
Hi Kavita khup margadarshak ahe..krupaya purn Kavita milavi hi vinanti
जगण्याचा पाया..
पन्नाशी उलटली वरती झाली 24 वर्षे
अजूनही मागणे तेच माझे कानाडोळा इतका करू नका
असाल वाटले सुज्ञ तुम्ही नाही
वाटावी मत लाज, इतके मूर्ख राहू नका
खूपच छान! पण ही पूर्ण नाही, अपूर्ण आहे...
खूपच छान! पण ही पूर्ण नाही अपूर्ण आहे...
टिप्पणी पोस्ट करा