मंगळवार, २७ मार्च, २००७

कर्मयोग - भाऊसाहेब पाटणकर

सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू

मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?

भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी
सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी

निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या
धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या

अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू?
मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु

प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे
सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे

२ टिप्पण्या:

कोहम म्हणाले...

bahot khub....lage raho

रोहित म्हणाले...

हा अभिप्राय या एकाच नोंदीसाठी नाही. तो तुमच्या एकंदरीत अनुदिनीसाठीच आहे.
तुमची अनुदिनी पहिल्यांदा बघितली तेव्हाच कळलं ही सुगंधाची कुपी आहे. केवळ एकदा वाचण्यासाठी नाही, तर मनाला वाटेल तेव्हा फिरून फिरून येण्यासाठी. इतक्या भिन्न प्रकारच्या, भिन्न मूड्‍सच्य कविता तुम्ही एका छताखाली ठेवल्यात त्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
हा तुमचा उपक्रम असाच निरंतर चालू राहो ही शुभेछ्छा.