गुरुवार, २१ फेब्रुवारी, २००८

लिलीची फुले - पु. शि. रेगे

लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!

- पु. शि. रेगे

1 टिप्पणी:

माय मराठी म्हणाले...

कवी पु. शि. रेगेच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती.
परदेशी असलेली त्यांची प्रेयशी म्हणजे लिलीचे फूल.प्रेमाचे रूपांतर विवाहात होऊ शकले नाही. ती केवळ आठवणच राहिली. लिलीचे फुले व प्रेयसीचे साहचर्य, तिच्या डोळ्यातील निर्मळ प्रेमभाव बरच काही...