शुक्रवार, ९ मे, २००८

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या - बी

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळूनी लावण्य बर वहावे

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे

हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी


प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"

६२ टिप्पण्या:

Asha Joglekar म्हणाले...

खूप वर्षांनी वाचायला मिळाली ही कविता. पण एक कडवं असंही होतं ना
मुली शाळेतिल असती त्या चटोर
एकमेकी ला बोलती कठोर
काय बाई चित्तात धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे

श्रीरंग म्हणाले...

हो बरोबर...

Archana Mahesh म्हणाले...

हो, त्या ओळी पंक संपर्क कमल का भिकारी च्या पूर्वी होत्या

Nandkishor J. Muley, म्हणाले...

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या...डोळे भरल्या शिवाय रहात नाहीत ..आजूनही...

sainath jamdade म्हणाले...

खुप छान कवीता आहे.उपमा अलंकाराची ही कवीता
आजही डोळे भरून आले. जेव्हा ऐकवली बारक्यांन. . . . . .

sainath jamdade म्हणाले...

खुप छान कवीता आहे.उपमा अलंकाराची ही कवीता
आजही डोळे भरून आले. जेव्हा ऐकवली बारक्यांन. . . . . .

sainath jamdade म्हणाले...

खुप छान कवीता आहे.उपमा अलंकाराची ही कवीता
आजही डोळे भरून आले. जेव्हा ऐकवली बारक्यांन. . . . . .

sainath jamdade म्हणाले...

खुप छान कवीता आहे.उपमा अलंकाराची ही कवीता
आजही डोळे भरून आले. जेव्हा ऐकवली बारक्यांन. . . . . .

Unknown म्हणाले...

उष्ण वारे वाहती नासीकांत , गुलाबाला सुकवती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरीला, काेण बाेलले माझ्या छबेलीला..!!

Unknown म्हणाले...

The best poem ever....

Unknown म्हणाले...

The best poem ever....

Unknown म्हणाले...

The best poem ever....

Unknown म्हणाले...

माझ्या लहानपणी माझे काका ताई साठी म्हणात तेव्हा खूप लहान होतो काही कळत नसत पण सारख ऐकू वाटायचं त्यावेळेस ऐकलेली ह्या कवितेचे ते शब्द आज ही ओठांवर असायचे .काही दिवसाूर्वी ते शब्द पुन्हा आठवले म्हणून मी ती कविता ऐकली यातला एक ना एक शब्द डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.
खरच आज कळाल शब्दातून भावना कश्या व्यक्त होतात ते

Unknown म्हणाले...

माझे वडील हि कविता मी लहान असताना माझ्यासाठी म्हणत खूप खोल अर्थ आहे... अप्रतिम कविता...

Unknown म्हणाले...

खूप छान

sachin b म्हणाले...

Full poem


गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !
sachin b म्हणाले...गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !
sachin b म्हणाले...गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !
Arch म्हणाले...


My mother used to sing everytime
Loved one

Unknown म्हणाले...

टचकन पाणीच आलं डोळ्यात

Unknown म्हणाले...

काळजाला हात घालणारी कविता

Unknown म्हणाले...

ह्रदयस्पर्शि कविता....

Unknown म्हणाले...

ही कविता खरेच अजरामर आहे. ऐकताना आजही शाळा, वर्ग आणि कविता शिकवणारे शिक्षक डोळ्यापुढे उभे राहतात.

Unknown म्हणाले...

खूप सुंदर भावगर्भ कविता

sandip mali म्हणाले...

Nice

Unknown म्हणाले...

शाळेत आठवीच्या अभ्यासक्रममध्ये ही कविता होती , तोंडी परीक्षेत पाठांतरासाठी हीच कविता होती आणि पूर्ण मार्क मिळाले होते, आजही ही कविता लक्षात आहे, शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या

Unknown म्हणाले...

शाळेत आठवीच्या अभ्यासक्रममध्ये ही कविता होती , तोंडी परीक्षेत पाठांतरासाठी हीच कविता होती आणि पूर्ण मार्क मिळाले होते, आजही ही कविता लक्षात आहे, शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या

Unknown म्हणाले...

आपण दिलेल्या कडव्यासह ही कविता पुर्ण होते का? की याशिवायही अधिक कडवी आहेत?
वरील कडवे पुरवण्यासाठी धन्यवाद.🙏

Unknown म्हणाले...

आपण दिलेल्या कडव्यासह ही कविता पुर्ण होते का? की याशिवायही अधिक कडवी आहेत?
आपण पुरवलेल्या कडव्यासाठी धन्यवाद.

Unknown म्हणाले...

आज या कवितेची आठवण आली. ..

अगदी डोळे भरून आले

Unknown म्हणाले...

खरंच खूप छान कविता आहे, आम्ही शाळेत असताना वाचलेली आठवते...

Unknown म्हणाले...

खरच ही ह्वदयस्पर्शि कविता लिहताना कवि ला कपी कपी
आली असेल.खूप छान

Shreerang म्हणाले...

खुपच सुंदर... श्रीमंत मराठी

Kalpgandh म्हणाले...

धन्यवाद....माझी आई ही कविता म्हणायची.....

Unknown म्हणाले...

खूप छान .. माझ्या आवडीची कविता

Unknown म्हणाले...

Chann(*˘︶˘*)

रामदास कुलकर्णी म्हणाले...

आमचे वडील खूप ड्रिंक करायचे , पण नेहमी ही कविता म्हणायचे , ही कविता म्हणजे त्यांची आठवण येते , डोळ्यात पाणी न येता ही कविता वाचणे अशक्य आहे

रामदास कुलकर्णी म्हणाले...

आमचे वडील खूप ड्रिंक करायचे , पण नेहमी ही कविता म्हणायचे , ही कविता म्हणजे त्यांची आठवण येते , डोळ्यात पाणी न येता ही कविता वाचणे अशक्य आहे

Unknown म्हणाले...

hee kavita vachtanach urr bharun yeto, athavanitalya diwasat man ramun jaate. Tevha he khup god hoti ni atahi khupach god aahe. Mulicha baap zalyavar ajunach manala bhidate..

Sudhir म्हणाले...

Yet nahi

sanich म्हणाले...

सुंदर

Unknown म्हणाले...

सर्वांच्या मनावर राज्य करणारी कविता तुमच्या टिपण्या वाचुन अजून रडू आले

Unknown म्हणाले...

अगदी बरोबर

Unknown म्हणाले...

Khup Chhan Kavita Aahe

Unknown म्हणाले...

माझ्या मनातील कविता. मी माझ्या मुलांसाठी अंगाई गीत म्हणून गात असे.

Unknown म्हणाले...

माझी आई हि कविता म्हणून अंगाई गीत गात होती त्यावेलेस मला अर्थ समजून सांगताना तिच्या डोळ्यात पाणी तर्मले आणि माझ्या सुध्या . हि कवीता आज मी माझ्या मुलीला ऐकविली तर माझ्या डोळ्यात अश्रू आले

Unknown म्हणाले...

mazi mumma la khup kup aawadt hoti hi kavita,aaj ti mazya barobar nahi aahe pan jase tine mala shikawali hoti hi kavita mi pan mazya mulana shikvin..

Unknown म्हणाले...

खूप हृदयस्पर्शी कविता, डोळ्यात पाणी आणणारी, मी माझ्या मुलाला व आता माझ्या नातीला झोपवताना हीच कविता म्हणत असते

Unknown म्हणाले...

माझे वडील माझी बहिण लहान असताना ही कविता
म्हणायचे. :)

Unknown म्हणाले...

60---65 वर्षापूर्वी आम्हाला पण ही कविता होती

Unknown म्हणाले...

अतिशय सुंदर आठवण...काही ओळी आठवतात.
अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर च्या दरम्यान शिकविलेली.
संकलकास मनपुर्वक धन्यवाद आणी खूप शुभेच्छा.
अर्जुन विभुते

Unknown म्हणाले...

Majhi pn favourite kavita ahe.. Mi majhya baby la hich kavita aikaun jhopavate.. Tyala marathi nahi yet tari pn mhante

Unknown म्हणाले...

अतिशय आवडती .कविता माझी आई आम्हा बहिण भावांना झोपवतांना नेहमी म्हणायची.आणि तिच्या डोळ्यातील आंसवे गालावरुन ओघळुन आमच्या शरीरावर पडत.

प्रभाकर वंजारी, प्राचार्य सनफ्लावर इंग्लिश एण्ड हिन्दी हायर सेकंडरी स्कूल मोहगांव जिला छिंदवाड़ा म्हणाले...

खरोखर ही कविता अप्रतिम आहे. ही कविता आज ही गातांना हृदय भरुन येत.ही कविता भावपूर्ण हृदय स्पर्शी आहे.मी तर म्हणतो की प्रत्येक वडिलांनी ही कविता आपल्या मुलिला ऐकविली पाहिजे.

प्रभाकर वंजारी, प्राचार्य सनफ्लावर इंग्लिश एण्ड हिन्दी हायर सेकंडरी स्कूल मोहगांव जिला छिंदवाड़ा म्हणाले...

खरोखर ही कविता अप्रतिम आहे. ही कविता आज ही गातांना हृदय भरुन येत.ही कविता भावपूर्ण हृदय स्पर्शी आहे.मी तर म्हणतो की प्रत्येक वडिलांनी ही कविता आपल्या मुलिला ऐकविली पाहिजे.

Unknown म्हणाले...

खुपच काळजाला हात घालणारी कविता, मी आज माझ्या संपूर्ण कुटुंबीयांसह गायली

Unknown म्हणाले...

खूपच छान ह्रदयस्पर्शी .....

Unknown म्हणाले...

गाई पाण्यावर आल्या ही कविता आम्हाला अभ्यासक्रमाला होती. खुप आवडीने आम्ही ती चालबध्द म्हणायचो परंतु अभ्यासक्रमात ही कविता संक्षिप्त होती.परंतु येथे विस्तारीत स्वरूपात वाचायला भेटली.

Unknown म्हणाले...

Deep meaningful poem आजही ही कविता बापाच्या अंतरंगाचा ठाव घेते मुलीच्या बापाचे ह्रदय पिळवटून टाकणारी कविता एक गरीब बाप परिस्थितीने पीचलेला आहे आतून पर्ण पणे तुटलेला आहे परंतु मुलीला समर्पक शब्दात समझावतो कविला सलाम

Unknown म्हणाले...

Feeling nostalgic

Bhushan गोसावी म्हणाले...

खूप छान, अगदी आजीबाची आणि आजीची आठवण आली, अगदी तोंड पाठ असायची ही कविता, जेवताना झोपताना तर अगदी माडीवर घेऊन झोपवायचे।।

Unknown म्हणाले...

माझे यजमानांना आठवीला असताना होती ही कविता...आमची कन्या लहान असताना ते नेहमी तिच्यासाठी बोलायचे..खूप छान आठवण..