बुधवार, २८ जानेवारी, २००९

जन पळभर म्हणतिल - भा. रा. तांबे

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?

११ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

फार सुंदर, वास्तविक शालेय अभ्यासक्रमात होती.

Unknown म्हणाले...

फार सुंदर, वास्तविक शालेय अभ्यासक्रमात होती.

vikas म्हणाले...

लहानपणापासून मनात घर केलेली ,कविता

vikas म्हणाले...

लहानपणापासून मनात घर केलेली खुप सुंदर कविता

Unknown म्हणाले...

खूप छान कविता आहे . आयुष्यचे सार आहे.

Unknown म्हणाले...

खूपच छान जून्या शाळेतील आठवनीना उजळा मिळाला मन भरून आले

Unknown म्हणाले...

शब्दच अपुरे आहेत मस्त

Unknown म्हणाले...

हे गाणे सर्वकाळासाठी लागू असल्याने आणि त्याचा शब्दार्थ अत्यंत व्यवहार्य असल्याने ते मला आवडते.

Unknown म्हणाले...

माझ वय 51 आ हे,मा झ्या अजूनही पाठ आ हे ,माझे शालेय जीवनातील आवडलेली हि कविता आ हे

Unknown म्हणाले...

माझ वय 51 आ हे,मा झ्या अजूनही पाठ आ हे ,माझे शालेय जीवनातील आवडलेली हि कविता आ हे

Hemant Patil म्हणाले...

क्षणभंगुर आयुष्याचं यथार्थ वर्णन केलेली कविता