शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

मानूस - बहीणाबाई चौधरी

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
Prashant म्हणाले...

मित्रहो,
कविता सुंदर आहे. कुणाकडे याचे रसग्रहणावरचे लेख आहेत का?
वेगवेगळ्या बोलीभाषेतले अर्थ स्पष्टपणे मांडले तर सगळ्यांना योग्य तो अर्थ समजेल.

कविता सादर केल्याबद्दल धन्यवाद.