शुक्रवार, २८ मे, २०१०

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला - विंदा करंदीकर

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||

६ टिप्पण्या:

Maithili म्हणाले...

Hi kavita aamhala aatta baravila English chya pustkaat (translate karun ) hoti...
Pan marathit jevadhi bhavali tevhadi English madhye nahi...

Vishnu Gopal Vader म्हणाले...

eka changali kavita vachayala dilyabaddal dhanyavad!

Vishnu Gopal Vader म्हणाले...

eka changali kavita vachayala dilyabaddala dhanyavad!!

Rahul Gawas म्हणाले...

आपले खूप खूप आभार अशी कविता वाचण्यास उपलब्ध करून दिला

Unknown म्हणाले...

ही कविता कोणत्या कवितासंग्रह मधीलो आहे

ज्ञानदीपक म्हणाले...

मुळ कविता ज्या भाषेत असते त्यातच गोड वाटते