सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

बरसात - शांता शेळके

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा.

संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात...

२ टिप्पण्या:

Swapnil Demapure म्हणाले...

Jithe na pohache ravi tithe pohache kawi

Unknown म्हणाले...

टिप्पणी काही कराया
लायकी माझी नसे
तोडतानाही जिथे हो
वेदनेचा दाह आहे.

लाजवाब.