शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

उनाड व्हावे - दि. पु. चित्रे

उनाड व्हावे रक्त इथे अन
डोळ्यांना पालवी फुटावी
अन श्वासांच्या संथ झऱ्यांतून
लकेर हळवी तरळत जावी
झुळझुळणाऱ्या जिवंततेला
मरणाच्या मग खुणा पटाव्या
छातीच्या गहिऱ्या मेघातुन
अदृष्टाच्या विजा पळाव्या
दूर असावे स्वतःपासुनि
स्वतःपणाचा अर्थ नुरावा
फक्त वाहणाऱ्या ओळींना
अशाश्वताचा सूर कळावा
उनाड व्हावे रक्त इथे अन
फक्त निळे आकाश उरावे
तंद्रीच्या धूसर वाऱ्यावर
अन ताऱ्यांचे स्वप्न झुरावे

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Chan

अभिजात कविता गणेश गोडसे म्हणाले...

अतिशय सुंदर कविता

Rahul Vishwanath Bhoyar म्हणाले...

वाटले मनाला माझ्या घ्यावं थोडं गुंतवून
वाचावे कुणी ते कवितेची गझल समजून

सोनबा.. ✍️

Piyush Odhekar म्हणाले...

सुंदर कविता!!