सोमवार, २९ जानेवारी, २००७

पाउस - ग्रेस

पाउस कधीचा पडतो
झाडांचि हलति पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यत ऊतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडाला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेन
हि शुभ्र फुलांचि ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापशी
पाउस असा कोसळला

सन्दिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यवरती
लाटंचा आज पहारा

२ टिप्पण्या:

Ashwini म्हणाले...

माझ्या अनेक आवडत्या कवितांपैकी ही एक...

पहिल्या ओळ 'पाऊस कधीचा पडतो..' अशी आहे असे मला वाटते..चू.भू.द्या.घ्या.

रोहित म्हणाले...

या कवितेची पहिली ओळ "पाऊस कधीचा पडतो" अशीच आहे. ही कविता वाचून किती आनंद झाला काय सांगू? मला ही कविता प्रचंड आवडते. कारण बहुदा ही ग्रेसांच्या सगळ्यात सोप्या कवितांपैकी एक आहे. सरळ, साधी, आशयगर्भ. विशेषतः शेवटचं कडवं - घरं धूसर दिसतायत असं कोणीही म्हटलं असतं, पण ग्रेसांना ती घरं "संदिग्ध" दिसतात... त्यांच्या प्रतिभेला सलाम!