शनिवार, ९ डिसेंबर, २००६

औदुंबर - बालकवी

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

५ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

बऱ्याच मेहनतीनंतर हि अप्रतिम कविता मला गवसली. धन्यवाद.

Thinker म्हणाले...

Farach sundar Ashi hi Kavita samikshakanahi awhan karate

Unknown म्हणाले...

आज 5 मे. बालकवी यांचा स्मृतिदिन ...आणि ही कविता अप्रतिम

Unknown म्हणाले...

मन हरवून जातं, कविता वाचता वाचता

Unknown म्हणाले...

आज बालकवी न मुळे बालपण परत एकदा गवसले...