मंगळवार, ३ एप्रिल, २००७

चुकली दिशा तरीही - विंदा करंदीकर

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

४ टिप्पण्या:

Ranjeet म्हणाले...

Mazi all time favourite kavita aahe hi! :-)

Unknown म्हणाले...

Awesome

Unknown म्हणाले...

आपण घेतलेल्या पुढाकाराबद्दल आपल्यास मनःपूर्वक धन्यवाद. 🙏

Truptee म्हणाले...

Sundar.. 😘