गुरुवार, १२ एप्रिल, २००७

बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासून
हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी
डोळ्याचे ना खळे पाणी
आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला
याच्या आवडीचे चार, करू सुंदर पदार्थ
काही देऊ बरोबर
त्याचे बघा ठेवीले का, नीट बांधून सामान
काही राहिले मागून
नको जाऊ आता बाळ, कुणा बाहेर भॆटाया
किती शिणवीसी काया
वाऱ्यासारखी धावते, वेळ भराभर कशी!
गाडी थांबेल दाराशी
पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस
ऊंच भरारी घेऊन, घार हिंडते आकाशी
चित्त तिचे पिलापाशी
बाळा, तुझ्याकडे माझा जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील
बाळ जातो दूर देशा; देवा, येऊन ऊमाळा
लावी पदर डोळ्याला

१३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Dear Gopinath,
I am sorry as I donot know how to type in Marathi and hence I am writing to you in English.

You have expressed the feeling of a mother whose son goes out in the world to earn the name and fame for himself and the family.

Every word you have written is experinced by me and my wife when our son goes away from us. We experience the smae thing in the same way on each and every occassion ending with a tearful send off. Every time we decide that let us control our tears, he is going out for the good and he will come back but at the time of send off as usual we can not control our tears.

After reading the poem we concluded that there is some one who will not call a big fool and laugh at us for our silken bond of love towards our child.

ANIL

Pramod म्हणाले...

this poem was published in school book i remember . Boy shows his hand waving to mother in bullock cart , really i weep to read this poem.
pramodgokhale pune --9225734459

Unknown म्हणाले...

मलासुद्धा प्राथमिक शाळेमध्ये ही कविता होती आईपासून दुरावलेल्या मुलाचा विरह कवितेमध्ये सांगितलेला आहे त्यावेळी बालसुलभ तिला वृत्तीला अनुसरून अर्थ समजत नव्हता परंतु त्यावेळेचे शिक्षक कविता पाठांतर करून घेत आज ती कविता आठवते व त्याचा अर्थही चांगल्या प्रकारे उमगला

Unknown म्हणाले...

Malasudda ayhavte hi poem ti bailgadi. Tamdhe buslela mulga tachI ai daratun nirop dete

Unknown म्हणाले...

Mazya baba n chi avadti kavita ahe Sir

Unknown म्हणाले...

Sirexcellent. After reading this poem I remember my svhool. hHaribhai high school Solapur.really i wept.I was searching this poem today I found and notred down.Thanks

Unknown म्हणाले...

माझ्या वडिलांच्या आठवणी स्पीचलेस

Unknown म्हणाले...

My great grandmother used to sing this poem ..she passed away in 2015 at 95 age.This is definitely an old poem

कनक म्हणाले...

मनातल्या भावना शब्दरूपाने अगदी जशाच्या तशा मांडल्या आहेत..खूप भावनिक असते अशी वेळ...कवींना मनापासून धन्यवाद..एवढ्या सुंदरपणे मांडणी.. माझ्या आईला होती ही कविता शाळेत..अजूनही तोंडपाठ आहे तीची..कवींना प्रणाम🙏🙏🙏

Unknown म्हणाले...

I studied in Sane Guruji Vidyalaya, Dadar, Mumbai. This poem was taught to us by our respected teacher Mrs. Uashatai Prakash Mohadikar and Mrs. Choudhari Madhukarrao madam. They used to teach us so emotionally that almost everyone used to cry.Today also after going through this poem it took me to my good golden days of school life n made me cry. I will never forget the the sanskar that our school has given to us and also Thembe Thembe Tale Sanche..... Daily saving of one paise from our school pocket money for helping the needful and for our future 🙏🙏🙏

Unknown म्हणाले...

ही कवीचा कुणी गायली आहे ?

एक मराठी प्रेमी म्हणाले...

आईची मुलावरील माया याची कशाशीही तूलना होऊ शकत नाही, ही जगात एकमेव! शाळेत असताना रडवलेली आणि अजूनही तो परिणाम करणारी एक अप्रतीम कविता, हीरा, जी अमर झाली आणि श्रेष्ठ मराठी कवितांच्या पंगतीत आपले स्थान पक्के केले! अजूनही सत्तरी नंतर काही भाग आपोआप पाठ, कधीकधी मनात तरळतो आणि चालही लक्षात राहिली अश्या गटातील!
या व इतर मराठी कवितांवर इंग्रजीत मत प्रदर्शन पाहून अतीव दुःख होते. आपण मराठी लोक इतके इंग्रजीच्या गुलामीत का की मराठी कवितेवर मराठीत दोन शब्द लिहू शकता नाही आणि अनेक मराठी शाळेत शिकलेले असताना! मला पान इंग्रजी आवडते पण मराठीची हकालपट्टी होत असेल तर नको का सावध व्हायला. यासाठी गुगल ट्विंन की-बोर्ड सुरेख व वेळ वाचविणारा आहे. आपल्या भाषेसाठी ,तिच्यावरील प्रेमासाठी आणि ती जिवंत ठेवण्यासाठी थोडे कष्ट व वेळ नको का द्यायला, सर्व सूज्ञ आहात, पण नकळत मराठी भाषेच्या, आपल्या आईच्या भाषेच्या ऱ्हासास कारण होऊ नका ही कळकळीची विनंती..

Unknown म्हणाले...

डोळ्यात पाणी आणणारी सुंदर भावस्पर्शी कविता.लहानपणी शाळेत पाठ केलेली.आज जे ६५-७० वर्षाचे असतील त्या मराठी शाळेत शिकणार्‍या अनेकांना आजही ही कविता आठवत असेल.एका माऊलीची ,बाळाच्या विरहानं व काळजीनं तिची होणारी घालमेल फार सुंदर रितीने नजरेसमोर येते.