मंगळवार, ३ जुलै, २००७

दिलगीरी

कार्यबाहुल्यामुळे इथे कविता पाठवणे अवघड जात आहे. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
जर आपल्याकडे काही कविता असल्यास त्या आपण जरुर पाठवू शकता!

२ टिप्पण्या:

मन कस्तुरी रे.. म्हणाले...

हल्ली मराठी गीतांना निदान ब्लॉग विश्वात तरी चांगले दिवस आलेले दिसतात!
सारख्या "मराठी चित्रपटातिल गाणी" वर भरभरुन वाहणार्‍या गीतांमुळे आपला हा अभिजात कवितांचा ब्लॉग जरा दुर्लाक्षित होतो आहे का?

मला इथे कधीपासून सुधीर मोघेंच्या काही रागांवर आधरित सुंदर कविता व ना.घ. देशपांडेंची एक दीर्घ कविता "कंचनीचा महाल" लिहायची आहे पण वेळ मिळत नाही.

पण कधी कुठ्ली आवडती कविता अचानक वाचाविशी वाटली तर ती मिळते इथे...याहून अधिक काय हवे?

कवितेच्या प्रेमात पडण्याचे हे बिलोरी क्षण जपून ठेवा...वाढवा.


अश्विनी

bhakit म्हणाले...

Aaplya velanusar hi Mardhekaranchi kavita aaplya sangrahat nondvavi.

dhnyavaad,
Bhakit.

बा. सी. मर्ढेकर

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुण्याच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||


जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||