संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा
गुरुवार, १९ जुलै, २००७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२ टिप्पण्या:
तुमचा ब्लॉग खूपच छान आहे...फार आवडला ...तुमाला आजुन ल्हीवायला पाहिजे...तुमच कविता फार छान आहे..हीसाईटपहा तुम्ही http://quillpad.in/marathi/ हेचणा तुमाला आजुन मदाद वाहील...
kavita khup khup chan aahe....ameya date chya aavajat hi me pratham ikali hoti....tevha pasun lyrics shdhanyacha prayatna kela .... must se thanks to u for all these wonderful postings
टिप्पणी पोस्ट करा