सोमवार, १८ डिसेंबर, २००६

सायंकाळची शोभा - भा.रा.तांबे

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे ईंद्रघनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे, फुले साळिस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.
झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!
पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?

१५ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Khupc Chan aahe kaviKa.mi shalet Astana MLA 4th mde hi kvita hoti.ajun hi MLA hi kvita khup aavdte ..

Unknown म्हणाले...

Khupc Chan aahe kaviKa.mi shalet Astana MLA 4th mde hi kvita hoti.ajun hi MLA hi kvita khup aavdte ..

Unknown म्हणाले...

हो चौथीला होती ही कविता..आमच्या बाई समरसून शिकवायच्या..खूपच छान..nostalgia

Unknown म्हणाले...

mast kavita

Unknown म्हणाले...

Mala phkta sevat che aathawat vote mhanun pahila very beautiful....

Unknown म्हणाले...

Lovely poem 😊

Shaila Wagh म्हणाले...

कितीतरी शोधत होते.कविंचे नाव आठवत नव्हते.शेवटी type केले " कुठे बुडला पलिकडील तो सोन्याचा गोळा "

Shaila Wagh म्हणाले...

Unknown म्हणाले...

लहानपण आठवले..

Pratik_Marathi/English म्हणाले...

आयुष्यभर लक्षात राहील अशी कविता...!

Unknown म्हणाले...

ह्या कवितेचे स्पष्टीकरण कुणी देईल का?

Ambadas Paradhi म्हणाले...

मी चौथीच्या वर्गात होतो तेव्हा खूपच आवडायची ही कविता आणि आजही।

Unknown म्हणाले...

Ho 4th Standard la hoti hi kavita . Khup chan sayankalach warnan aahe aani ti shobha Khedyatach pahili pahije.

Unknown म्हणाले...

Mala hi kavita khup aawdte. Mi ajunahi hi kavita mazya mulala gavun sangte😁

मालवणी आठवणी म्हणाले...

अतिशय सुंदर