बुधवार, १३ डिसेंबर, २००६

देणार्याने देत जावे - वि. दा. करन्दीकर

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Chaan

Unknown म्हणाले...

आगदी खरे आहे

Unknown म्हणाले...

देणाऱ्या व्यक्तीचा दातृत्वाचा गुण घेण्यासारखा आहे .