रविवार, २० फेब्रुवारी, २०११

दिवे लागले रे - शंकर रामाणी

दिवे लागले रे, दिवे लागले रे,
तमाच्या तळाशी दिवे लागले;
दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना
कुणी जागले रे? कुणी जागले?

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले;
तिथे मोकळा मी मला हुंगितांना
उरी गंध कल्लोळुनी फाकले...

उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले?
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन
उष:सूक्त ओठात ओथंबले...

२ टिप्पण्या:

Yashashri Rahalkar म्हणाले...

ही कविता इंदिरा संत यांची आहे ना

Unknown म्हणाले...

शंकर रामाणी यांची आहे.